जेव्हा आशाताईंनी दादा कोंडकेंना घातली होती लग्नाची मागणी, पण दोन अटींमुळं विषय तिथंच संपला

जेव्हा आशाताईंनी दादा कोंडकेंना घातली होती लग्नाची मागणी, पण दोन अटींमुळं विषय तिथंच संपला

Ashatai  :

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस. वयाच्या ११ व्या वर्षी १९४४ साली त्या सर्वप्रथम गायल्या. म्हणजे गेली दशके त्या गात आहेत. संघर्षाचं दुसरे नाव आशा भोसले आहे, असं अनेकदा म्हटलं जातं.

गेली अनेक दशके आपल्या गोड गळ्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका आशा भोसले आज, ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या गाण्याबद्दल बोलावं तितकं कमीच. वयाच्या ९० त्या आज दुबईत लाइव्ह शो करतायत. यातचं त्यांच्या आयुष्याचं तरुणपण दडलंय. आजही त्या दिसायलाही तितक्याच तरुण, त्यांचं गाणंही तरुणच आहे. आशाताईंबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं हास्य.

पण हसऱ्या चेहऱ्यामागं अनेक कहाण्या दडल्या हे तितकंच खरं. लग्नानंतरच्या सांसारिक अडचणींपासून, मुलीच्या अकाली निधनापर्यंत संकटांचा पाऊसच त्यांच्या व्यक्तिगत जीवनात पडला. आयुष्यात खूप काही घडून गेलं असलं तरी, त्या म्हणतात की, आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी या आपणच सोडवायच्या असतात. आपल्या संकटांना आपणच धीरानं सामोरं जायचं असतं. समोरची माणसं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. अशा वेळी आपुलकीनं जमणाऱ्यांना आपल्या गाण्या-बोलण्यातून आनंदच द्यावा ना!’

आशा निराशा

खरं तर आताशाईंच्या आयुष्यातवर एखादा बायोपिक आला तर त्यात सगळंच असेल. गाणं, प्रेम, स्पर्धा, वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्याच. त्यांचं गाणं जितकं डोक्यावर घेतलं, तेवढीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. तर आर. डी बर्मन यांच्याशी लग्नकरण्याआधी आशाताई दादा कोंडके यांच्यासोबत नात्यात होत्या, असं म्हटलं जात असे.

दादा कोंडके यांचं आत्मचरित्र एकटा जीव यात ‘आशा निराशा’ असं म्हणत या नात्याचा उल्लेखही करण्यात आलाय. पण या नात्याची तेव्हा फार चर्चा झाली नव्हती. दादा कोंडकें यांचं पहिलं लग्न चार वर्षातच मोडलं होतं. त्यामुळं त्यांच्या आयुष्यातही ते एकटेपण होतंच. तसंच आशाताईंचीही पहिलं लग्न फार काळ टिकलं नव्हतं.

दीदींनाही होती कल्पना

१९७६ चा काळ …जेव्हा दादा कोंडके सुपरस्टारडम अनुभवत होते. विच्छा माझी पुरी करा नाटकानं धुमाकूळ घातला होता. याचदरम्यान, आशाताई आणि त्यांची भेट झाली. दोघंही भेटायचे, शॉपिंगला जाणं, हॉटेलींग हे सगळं सुरूच होतं. तसंच दादा कोंडकेही त्यांना वेळ असेल तेव्हा आशाताईंसोबत गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही जात असत. दादा कोंडके यांचं त्यांच्या घरीही येणं-जाणं असायचं, त्यामुळं लतादीदींनाही या नात्याची कल्पना होतीच.

admin